संपर्क महाराष्ट्र सागरी मंडळ भारत सरकार

लहान बंदरांच्या हद्दीतील स्वनियंत्रित धक्के

राज्याच्या किनारपट्टीनजीक स्थापन झालेल्या उद्योगधंद्यांकरिता लागणा-या कच्च्या मालाची आयात व तयार होणा-या पक्क्या मालाची निर्यात जलमार्गाने करण्यासाठी किनारपट्टीवर स्वनियंत्रित धक्के (कॉप्टीव्ह जेट्टी) बांधण्यासाठी खाजगी उद्योजकांना स्वनियंत्रित धक्क्यांच्या धोरणास अधीन राहून परवानगी देण्यात येते. हया धोरणाची ठळक वैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत.
  • स्वनियंत्रित धक्क्याकरिता (कॉप्टीव्ह जेट्टीकरिता) विकासकास वॉटरफ्रन्ट भाडेपट्टयाने उपलब्ध करुन देण्याबाबत शासन मान्यतेने 30 वर्षांचा करार.
  • कॉप्टीव्ह जेट्टीचे संपूर्ण बांधकाम बांधा, वापरा व हस्तांतरीत करा (BOT) तत्वावर.
  • जेट्टीचे बांधकाम, दुरुस्ती, परिरक्षण व व्यवस्थापन ही कॉप्टीव्ह जेट्टीच्या धारकाची जबाबदारी
  • राजपत्राद्वारे राज्य शासनकडून अधिसूचित केलेल्या विहित दरानुसार चढणावळ/उतरणावळ शुल्काची आकारणी.
  • शासनाच्या मान्यतेअंती त्रयस्थ पक्षाची माल हाताळणी अनुज्ञेय.

सद्यःस्थितीत अस्तित्वात असलेले स्वनियंत्रित धक्के

अनु.क्र. बंदराचे नाव धक्क्याचा वापर करत असलेल्या कंपनीचे नाव   माल
1. पनवेल (उल्वा -बेलापूर) अंबुजा सिमेंट लि.   बल्क सिमेंट
2. करंजा जे एस डब्लू धरमतर पोर्ट प्रा. लि   आयर्न्
3. अलिबाग (धरमतर) इस्पात इंडस्ट्रिज लि   आयर्न् ओर, लिकर,कोक / कोल
स्पाँर्ज आयर्न्
4. रेवदंडा वेलस्पन मॉक्सस्टीललि.   आयर्न् ओर /पॉलेटस् / फाईन,
हॉट ब्रेकेटेडआयर्न्,
डायरेक्ट रिडयूसआयर्न्
5. दाभोळ रत्नागिरी गॉस ऍन्डपॉवर कंपनी लि   नाफता, हाय स्पिड डिझेल, एलएनजी (प्रस्तावित)
6. रत्नागिरी (पावस -रनपार) फिनोलेक्स कंपनी लि.   एलपीजी,एथोलिन डायक्लोराईड
7. रत्नागिरी (पावस -रनपार) फिनोलेक्स कंपनी लि.   कोळसा

नवीन सुरु होणारे प्रकल्प

अनु.क्र. सुरु होणाऱ्याकंपनीचे नाव बंदराचे नाव   मालाचा प्रकार
1. मे. टाटा पावर- ली. धरमतर खाडी, जिल्हा. रायगड   भू-संपादन सुरु आहे.
2. मे.सुप्रीम पेट्रोकेम लि ली. धरमतर खाडी, जिल्हा. रायगड   रस्ते जोडणी साठी प्रयत्न सुरु आहेत.
3. मे. जे एस डब्लू इन्फ्रा ली. नांदगाव, ता. पालघर जिल्हा. पालघर   DPR तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
4. मे. आय लॉग पोर्ट ली. नाटे ता. राजापूर जिल्हा. रत्नागिरी   भू-संपादन सुरु आहे.