संपर्क महाराष्ट्र सागरी मंडळ भारत सरकार

Inland Water Transport

महाराष्ट्र राज्याला ७२० किमी. लांबीच्या किनारपट्टीची निसर्गदत्त देणगी लाभलीअसून हया किनारपट्टीवर अनेक नद्या/खाडया आहेत. राज्याच्या लहान बंदरांतूनजलवाहतूकीव्दारे प्रतिवर्षी सुमारे १.८० कोटी इतके प्रवासी प्रवास करतात. 

प्रवासी  वमालवाहतूकीच्या दृष्टीने नद्या/ खाडयांमधून होणा-या अंतर्गत जलवाहतूकीचेअनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन, केंद्र शासनाने अंतर्गत जलवाहतूकीच्याविकासासाठी जाहीर केलेल्या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत रायगड जिल्हयातील करंजा,मांडवा, राजपुरी, जंजिरा किल्ला, दिघी व आगरदांडा, नांदेड जिल्हयातील विष्णुपुरी व यवतमाळ जिल्हयातील इसापूर येथे अंतर्गत जलवाहतूकीसाठी पायाभूत सुविधा निर्माणकरण्याचे आठ प्रकल्प मंजूर केले होते.

मांडवा आणि विष्णुपुरी येथील प्रकल्प पूर्ण झाले असून, उर्वरित प्रकल्प सन २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहेत.