महाराष्ट्र सागरी मंडळ
कामगिरी क्षणचित्रे
प्रवासी विभाग :
रायगड जिल्ह्यातील मांडवा या बंदरावर नवी रो रो प्रवासी जेट्टी आणि टर्मिनलचे बांधकाम सुरु झाले असून प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठीचा तरंगता पूल देखील तयार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने अंतरदेशीय जहाज कायद्यानुसार, जहाजांची सुरक्षितता (प्रवासी जहाजांवर जीवनरक्षक जैकेटची १०० टक्के उपलब्धता) जहाजांवरील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता या बाबी स्पष्ट केल्या आहेत.
सी प्लेन, या, पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरलेल्या, सेवेला परवानगी मिळाली आहे.
बंदरे
दिघी आणि धामणखोल-जयगड बंदराना जोडणाऱ्या राज्य महामार्गाचे विस्तारीकरण आणि सरळीकरण करण्याविषयी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मे दिघी पोर्ट लि. आणि मे जेएसडब्लू जयगड पोर्ट लि. सोबत करार केला आहे.
मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर जलवाहतूक सेवा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मुंबई बंदर विश्वस्त सोबत करार केला आहे
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने रायगड जिल्ह्यातील रेवदंडा खाडीत दोन स्वयंचलीत जेट्टी उभारण्यासाठी मे इंडो एनर्जी इंटरनैशनल लि कंपनी आणि मी जे एस डब्लू सालव स्टील लि कंपनीला परवानगी दिली आहे.
डहाणू तालुक्यात वाढवण येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे सैटेलाईट पोर्ट तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि जे एन पी टी यांच्यात ५ जून २०१५ रोजी सामंजस्य करार झाला आहे.
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने रायगड जिल्ह्यातील रेवदंडा खाडीत दोन स्वयंचलीत जेट्टी उभारण्यासाठी मे इंडो एनर्जी इंटरनैशनल लि कंपनी आणि मी जे एस डब्लू सालव स्टील लि कंपनीला परवानगी दिली आहे.
इतर
महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या विविध कार्यांसाठी आठ विविध सल्लागार नियुक्त करण्यात आले आहेत.
नौवहन विभागाच्या महासंचालकांच्या आदेशानुसार आय व्ही सीमा वाढवण्यात आल्या आहेत.
किनारी सुरक्षा /सागर कवच याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. .
वांद्रे कुर्ला संकुलात इमारत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे स्वतःचे कार्यालय सुरु करण्यासाठीची योजना.