बंदर प्रकल्प

राज्याच्या किनारपट्टी भागात होत असलेला वाढता औद्योगिक विकास लक्षात घेता बंदरांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीकोनातून हया बंदरांचा विकास खाजगी क्षेत्राच्या सहभागाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला व प्रथमतः सन 1996 मध्ये खाजगीकरणातून बंदर विकासाचे धोरण अंमलात आणले. तदनंतर, गुंतवणूकदारांना आकृष्ट करण्याच्या दृष्टीने बंदर विकास धोरणात सन 2000, 2002 व 2010 मध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत.

प्रचलित बंदर विकास धोरणाची प्रमुख वैशिष्टये

  • बांधा, मालकी, वापरा, सहभाग व हस्तांतरीत करा (BOOST) या तत्वावर विकास
  • सवलतीचा कालावधी 50 वर्षे (5 वर्षांच्या बांधकाम कालावधीसह)
  • बंदरातील मालहाताळणीवरील शुल्क ठरविण्याचे विकासकास स्वातंत्र्य. विकासकाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला सवलतीच्या दराने चढणावळ-उतरणावळ शुल्क अदा करावयाचे आहे.
  • बंदराचा विकास करणा-या विशेष हेतू वाहन कंपनीमध्ये राज्य शासन / महाराष्ट्र सागरी मंडळ यांचे 11 टक्यांपर्यंत समभाग.
  • बंदरांना उद्योगाचा दर्जा.
  • बंदर विकास धोरणांतर्गत सवलती (1) गौणखनिज उत्खननावरील रॉयल्टी माफ (2) वीज शुल्क माफी (3) बंदर कामकाजाशी करारांवरील मुद्रांक शुल्क माफ (4) बिनशेती आकार माफ
  • बंदर हद्दीपासून राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्ते जोडणीची जबाबदारी बंदर विकासकाची असेल.
  • रेल्वेच्या धोरणानुसार विशेष हेतू वाहन कंपनीमार्फत बंदराकरिता रेल्वे जोडणी.
  • कंपनी कायदा, 2013 नुसार 'कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ( सीएसआर ) प्रकल्पबाधित व्यक्तींसाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रचलित धोरणानुसार कार्यवाही.

कार्यान्वित प्रकल्प

अनु. क्र.

धक्क्याचा वापर करत असलेल्या कंपनीचे नाव

बंदराचे नाव

क्षमता मालाचा प्रकार

१.

मे. दिघी बंदर ली.

दिघी बंदर जिल्हा. रायगड

३० MTPA बॉकसाईट, कोळसा, H.B.O., लोखंडी सलई

२.

मे. अंग्रे बंदर प्रा. ली.

जयगड जिल्हा.रत्नागिरी

१० MTPA मालवाहतूक, जहाज दुरुस्ती
३.

मे. JSW जयगड बंदर ली.

धामणखोल जयगड जिल्हा.रत्नागिरी

५० MTPA बॉकसाईट, दगडी कोळसा, लोखंड माती, चुनखडी, मालवाहतूक, मली, रॉक फॉसफेट, कोळसा, साखर, सल्फर

 

नवीन सुरु होणारे प्रकल्प

अनु. क्र.

नवीन सुरु होनाऱ्या कंपनीचे नाव

बंदराचे नाव

सद्यस्थिती

१.

मे. रेवस बंदर ली.

रेवस-आवरे बंदर, जिल्हा. रायगड

सर्व तांत्रिक अभ्यास आणि तपास पूर्ण.
पूर्व बांधकाम उपक्रम प्रगतीपथावर.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या तसेच शिपिंग मंत्रालय, भारत सरकार यांचे काही मंजुरी बाकी

२.

मे. विजयदुर्ग बंदर प्रा. ली.

विजयदुर्ग जिल्हा. सिंधुदुर्ग

प्रकल्प पर्यावरण आणि वन , मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून TOR मिळाला व पुढील कारवाई लवकर सुरु होणे अपेक्षीत आहे.

३.

मे. रेडी बंदर ली.

रेडी बंदर, जिल्हा. सिंधुदुर्ग

प्रकल्प पर्यावरण आणि वन , मंत्रालय भारत सरकार यानपासून पर्यावरण मंजुरीची प्रतीक्षा करत आहे.

४. जेएनपीटी आणि म.सा.मं. वाढवन बंदर, ता.डहाणू जी.पालघर  सामंजस्य करार दि.५/६/२०१५ रोजी झाला आहे.