बंदर प्रकल्पांच्या तुलनेने कमी गुंतवणूक अपेक्षित असलेल्या बहुउद्देशिय जेट्टीप्रकल्पांच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या मालाची हाताळणी करण्यात येते. बहुउद्देशिय जेट्टीच्या बांधकामासाठी शासनाने १९ ऑगस्ट २००५ रोजी धोरण निर्गमित केले आहे. बहुउद्देशिय जेट्टीद्वारे लाइटरेंज ऑपरेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय माल हाताळण्यात येऊ शकतो.
बहुउद्देशियजेट्टीच्या निर्मितीसाठी असलेल्या धोरणाची वैशिष्टये खालीलप्रमाणे आहेत.
- जेट्टीचे ठिकाणाची निवड करण्याचे विकासकास स्वातंत्र्य.
- जेट्टीचे बांधकाम बांधा, मालकी, वापरा व हस्तांतरीत करा (BOOT) या तत्त्वावर.
- करारनाम्याचा कमाल कालावधी ३० वर्ष (हयामध्ये 2 वर्षांचा बांधकाम कालावधी समाविष्ट आहे).
- विकासकास प्रकल्पाचा तांत्रिक-आर्थिक सुसाध्यता अहवाल सादर करणे आवश्यक
- जेट्टीवरुन हाताळल्या जाणा-या मालावर कॉप्टीव्ह जेट्टीसाठी असलेल्या चढणावळ उतरणावळ शुल्काच्या दीडपट आकारणी.
- विकासकाची निवड जाहिरातीद्वारे होते.
(अ) सद्यस्थितीत अस्तित्वात असलेले बहुउद्देशिय धक्के
अनु.क्र. |
धक्क्याचा वापर करत असलेल्या कंपनीचे नाव |
बंदराचे नाव |
मालाचा प्रकार |
1. |
पीएनपी मेरीटाईमसर्व्हिसेस प्रा. लि. |
अलिबाग (शहाबाज-धरमतर) जिल्हा. रायगड |
कोल, आयर्न ओरफाईन्स्, सल्फर,बॉक्साईट |
2. |
इंडो एनर्जी इंटरनॉशनललि. |
रेवंदडा (सानेगांव) जिल्हा. रायगड |
कोळसा |
3. |
मरिन सिंडीकेट प्रा. लि. |
जयगड (कातळे) जिल्हा. रत्नागिरी |
- |
४ |
व्हाईट ओर्चीड ली. |
तेरेखोल, जिल्हा. सिंधुदुर्ग |
कोळसा |
नवीन सुरु होणारे प्रकल्पे
अनु.क्र. |
धक्क्याचा वापर करत असलेल्या कंपनीचे नाव |
बंदराचे नाव |
मालाचा प्रकार |
1. |
मे. करंजाइन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली. |
करंजा खाडी, ता. उरण जिल्हा. रायगड |
बांधकाम सुरु झाले आहे. |
2. |
मे. योगायतन बंदरे प्रा. ली. |
ठाणे खाडी , ता. कुर्ला जिल्हा मुंबई उपनगर |
बांधकाम सुरु झाले आहे. |
3. |
मे. कॉन्तिनेन्तल वेरहाउस ली. |
करंजा खाडी, ता. उरण जिल्हा. रायगड |
DPR तयार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. |