संपर्क महाराष्ट्र सागरी मंडळ भारत सरकार

कामगिरी क्षणचित्रे

प्रवासी विभाग :

  • रायगड जिल्ह्यातील मांडवा या बंदरावर नवी रो रो प्रवासी जेट्टी आणि टर्मिनलचे बांधकाम सुरु झाले असून प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठीचा तरंगता पूल देखील तयार करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने अंतरदेशीय जहाज कायद्यानुसार, जहाजांची सुरक्षितता (प्रवासी जहाजांवर जीवनरक्षक जैकेटची  १०० टक्के उपलब्धता) जहाजांवरील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता या बाबी स्पष्ट केल्या आहेत.
  • सी प्लेन, या, पर्यटकांचे मोठे आकर्षण ठरलेल्या, सेवेला परवानगी मिळाली आहे.

बंदरे

  • दिघी आणि धामणखोल-जयगड बंदराना जोडणाऱ्या राज्य महामार्गाचे विस्तारीकरण आणि सरळीकरण करण्याविषयी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मे दिघी पोर्ट लि. आणि मे जेएसडब्लू जयगड पोर्ट लि. सोबत करार केला आहे.   
  • मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर जलवाहतूक सेवा विकसित करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने मुंबई बंदर विश्वस्त सोबत करार केला आहे
  • महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने रायगड जिल्ह्यातील रेवदंडा खाडीत दोन स्वयंचलीत जेट्टी उभारण्यासाठी मे इंडो एनर्जी इंटरनैशनल लि कंपनी आणि मी जे एस डब्लू सालव स्टील लि कंपनीला परवानगी दिली आहे.
  • डहाणू तालुक्यात वाढवण येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे सैटेलाईट पोर्ट तयार करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि जे एन पी टी यांच्यात ५ जून २०१५ रोजी सामंजस्य करार झाला आहे. 
  • महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने रायगड जिल्ह्यातील रेवदंडा खाडीत दोन स्वयंचलीत जेट्टी उभारण्यासाठी मे इंडो एनर्जी इंटरनैशनल लि कंपनी आणि मी जे एस डब्लू सालव स्टील लि कंपनीला परवानगी दिली आहे.

इतर

  • महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या विविध कार्यांसाठी आठ विविध सल्लागार नियुक्त करण्यात आले आहेत.
  • नौवहन विभागाच्या महासंचालकांच्या आदेशानुसार आय व्ही सीमा वाढवण्यात आल्या आहेत.
  • किनारी सुरक्षा /सागर कवच याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. .
  • वांद्रे कुर्ला संकुलात इमारत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे स्वतःचे कार्यालय सुरु करण्यासाठीची योजना.