सेवा देण्यासाठीची प्रक्रिया: -
बहुउद्देशीय धक्के बांधण्यासाठी वॉटरफ्रंट मिळणेकरिता विकासकाकडून तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता अभ्यास अहवाल व रु.५ लाख (परत न मिळणारी) प्रक्रिया शुल्क यासह प्रस्ताव सदरहू अहवालाची तांत्रिक सुयोग्यता व सक्षमता या दृष्टीने छाननी करण्यात येईल. जर प्रस्ताव तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या सुयोग्य असल्याचे आढळून आल्यास संचालक मंडळाच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात येईल.
· मंडळाच्या मान्यतेअंती SWISS Challenge या पद्धतीचा वापर करून इच्छुक विकासकास परवानगी दिली जाईल.
· मंडळाच्या मान्यतेअंती विकसकास २४ महिने कालावधीसाठी इरादा पत्र (LOI) दिले जाईल.
o विकसकाला रुपये ३० लाख एवढा भरणा (परत न मिळण्याच्या अटीवर) इरादा पत्राच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत जमा करावा लागेल.
o विकसकाने प्रकल्प खर्चच्या २% रक्कम किंवा रु ५ कोटी जे कमी असेल ते ममेबो, च्या नावे बँक गॅरंटी इरादा पत्राच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत सादर करावी.
o विकसकाने तांत्रिक तपास आणि इतर आवश्यक अभ्यास पार पाडल्या नंतर तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) दोन महिन्याच्या आत सादर करावा.
o विकसकाने सर्व पर्यावरण विषयक मंजुरी प्राप्त करावे.
o विकसकाने आर्थिक आकृतीबंद प्राप्त करावा.
· विकसकास २४ महिन्यांच्या आत वरील सर्व अटी पालन करणे बंधनकारक राहील. तथापि, जर त्याला मुदतीची वाढ करण्याची विनंती केली तर त्यास जास्तीत जास्त एक वर्ष मुदतवाढ देण्यात येईल परंतु त्याने दिलेल्या बँकहमीमधून २०% रक्कम वजा केली जाईल. जर विकासक अटी पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरला तर इरादा पत्र (LOI) आपोआप रद्द होईल.
· विकसकाने वरील अटी व शर्ती पूर्ण केल्याचे संबंधित कागदोपत्री पुरावे दिल्यानंतर योग्य तो वॉटरफ्रंट भाडेपट्ट्याने देण्याकामी ३० वर्षांचा भाडेपट्टा करारनामा स्वक्षांकित करण्यात येईल.
ह्या प्रक्रिया संबंधित कोणताही विवाद असल्यास अपिलीय प्राधिकरण हे गृह विभाग (बंदरे), गृह विभाग, महाराष्ट्र शासन आहेत. अपीलाचा निपटारा जास्तीत जास्त २ महिने एवढ्या कालावधीत होईल.
कृपया अर्ज दाखल करण्यापूर्वी सेवा अर्ज प्रकिया प्रणाली काळजीपूर्वक वाचावी.
Download Application Form Download TEFS Reports