जलआलेखन सर्वेक्षण
जलआलेखन सर्वेक्षण हे सागरी पायाभूत सुविधा, लहान बंदरे यांचा विकास आणि कोणत्याही प्रकारची बंदर प्रकल्प उभारणी यासाठी पायाभूत मौल्यवान डिजिटल डेटा गोळा करतात.
महाराष्ट्र किनारपट्टीवर 720 किमी अंतरावर, 35 खाडी, 48 मध्यम आणि लहान बंदरे आहेत व त्यांचा आर्थिक वाढ व विकास सागरी पायाभूत सुविधा यास उत्तेजन देण्यासाठी जलआलेखक विभागाकडून दिल्याजाणाऱ्या मीहिती विकासकामात यांची भूमिका सर्वश्रेष्ठ आहे. जलआलेखक यांनी जलआलेखन माहिती ही राज्यातील सागरी पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी नियामक ठरेल .
सेवा मिळविण्यासाठी प्रक्रिया
जलआलेखक प्रामुख्याने बंदर विकास आणि पायाभूत सुविधा विकास करणारे विकासक यांच्यासाठी bathymetric चार्ट, bathymetric डेटा तयार करण्यासाठी आणि इतर माहिती गोळा करण्यासाठी गुंतलेले असतात. जलआलेखन सर्वेक्षण वार्षिक सर्वेक्षण वेळापत्रक तयार करण्यासाठी जून-सप्टेंबर महिन्यात MMB अधिकारक्षेत्रात विविध सरकारी संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि वेगळे प्रभारी, विविध बंदर अधिकारी यांच्याकडून मिळवतात. जलआलेखक सर्व आवश्यक माहिती संस्थेची गरज, आवश्यकता बघून सर्वेक्षण हाती घेतात.
शुल्क: -
1. जलआलेखन सर्वेक्षण – ममेबो अधिकार क्षेत्रात – रु. ५८०००/ दिवस
कार्यालयीन प्रक्रिया
अर्ज प्राप्त झाल्यानंतर, निर्णय प्रक्रिया १ महिन्याच्या आत पूर्ण होते (हवामान तसेच संसाधन यांच्यावर अवलंबून) ह्या प्रक्रिया संबंधित कोणताही विवाद असल्यास अपिलीय प्राधिकरण हे मुख्य बंदर अधिकारी, ममेबो. आहेत. अपीलाचा निपटारा जास्तीत जास्त १ महिना एवढ्या कालावधीत होईल.
कृपया अर्ज दाखल करण्यापूर्वी सेवा अर्ज प्रकिया प्रणाली काळजीपूर्वक वाचावी.
जलआलेखन सर्वेक्षण अर्ज