महाराष्ट्र सागरी मंडळ
प्रमुख कार्य
राज्याच्या किनारपट्टी आणि किनारपट्टीच्या पाठीमागील प्रदेशात आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून मालवाहतूकीस चालना देण्याकरिता लहान बंदरांचा विकास करणे.
जलवाहतूकीचे नियमन, भाडेतक्ता, जलयानांचे परवाने इत्यादिकरिता तसेच लहान बंदरांचे प्रशासन व संरक्षणाकरिता विविध सागरी अधिनियम व कायद्यांचे अंमलबजावणी करणे.
राज्यातील मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूकीकरिता अंतर्गत जलवाहतूकीचा विकास करणे.
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीलगत तसेच कोकण प्रदेशातील खाडयांमध्ये जलआलेखन सर्व्हेक्षण व इतर अन्वेषणे तसेच गाळ उपसणी करणे.
जल प्रवासी वाहतुकीसाठी नौकानयन मार्गात गाळउपसणी व देखभाल तसेच नौवहन सुविधांचे देखभाल करणे.
स्थापत्य अभियांत्रिकी विभागाद्वारे नवीन धक्के, जेट्टी, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालमत्तांची दुरुस्ती व देखभाल करणे.
जलक्रीडा साठी परवानगी, त्यांची अंमलबजावणी व नियमन करणे.
समुद्र किनाऱ्यावरील सामाजिक व आर्थिक क्षेत्र अंमलबजावणी करणे.
समुद्र किनाऱ्यावरील संभाव्य क्षेत्र नियंत्रण आणि वापर करणे .
राज्य शासनाने वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.