नागरिकांची सनद

अनुक्रमणिका

क्र. बाब
  प्रस्तावना
शासकीय व्यवस्थेत महाराष्ट्र सागरी मंडळाचे स्थान
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अखत्यारितील बंदर समूह निहाय कार्यक्षेत्र
महाराष्ट्र सागरी मंडळाची वैशिष्टये
महाराष्ट्र सागरी मंडळाचे  नागरीक
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या नागरीकांकडून असलेल्या अपेक्षा
महाराष्ट्र सागरी मंडळाचे उपक्रम
महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत नागरीकांना पुरविल्या जाणा-या सेवा
इनलॉण्ड व्हेसल्स ऍक्ट, 1917 अंतर्गत जलयानांची नोंदणी
महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत अंमलबजावणी करण्यात येत असलेले अधिनियम
१० बंदर विषयक पायाभूत सुविधा
११ महाराष्ट्र सागरी मंडळाची  कार्यालये
१२ विविध अनुज्ञप्त्या मंजुर करण्यासाठी कालमर्यादा / सक्षम प्राधिकारी
१३ नागरीकांना पुरविण्यात येणारे विविध परवाने/अनुज्ञप्त्या/सेवा व त्यासाठी असणारे अर्जाचे नमूने व शुल्क इत्यादि.
१४ तक्रारनिवारण अधिकारी

प्रस्तावना

महाराष्ट्र सागरी मंडळाची (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड) नागरीकांची सनद सादर करताना नागरीकांना विभागाविषयी माहिती असणे आवश्यक असल्याने विभागाची रचना व कार्य तसेच या विभागाकडून नागरिकांना पुरविण्यात येणा-या विविध सेवा, विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येत असलेले अधिनियम आदी बाबींचा या सनदेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्राला ७२० कि.मी.लांबीची किनारपटटी लाभलेली आहे. त्यापैकी अंदाजे मुंबई व उपनगरे  ११४ कि.मी., ठाणे १२७ कि.मी., रायगड १२२ कि.मी., रत्नागिरी २३७ कि.मी. आणि सिंधूदूर्ग १२० कि.मी. अशी ही किनारपटटी पसरलेली आहे. या किनारपटटीशी संलग्न ४८ लहान बंदरे असून रत्नागिरी व रेडी ही दोन मध्यम स्वरुपाची बंदरे आहेत. या किनारपटटीच्या जवळून वाहणा-या नदया व खाडया या किनारपटटीला येऊन मिळतात. हा प्रदेशही अत्यंत दूर्गम व अवघड आहे. वाहतूकीसाठी दूर्गम भूप्रदेश असलेल्या भागातील वाहतूकीची गरज ही किनारपटटी पूर्ण करते. सन १९६० सालापर्यंत वेगळा असा बंदर विभाग नव्हता. तोपर्यंत बंदराचा कार्यभार राज्य शासनाने भारत सरकारच्या अबकारी खात्याकडे सोपविलेला होता. नंतर बंदर विकासासाठी जनतेच्या वाढत्या मागण्यांचा विचार करता राज्य सरकारने बंदर विभागाला वेगळा करण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे बंदर विभागासाठी दिनांक १ एप्रिल १९६३ मध्ये वेगळे कार्यालय स्थापन करुन तत्कालीन इमारती व दळणवळण खात्याच्या अधिपत्याखाली मुख्य बंदर अधिकारी यांचे अधिपत्याखाली त्याचा कार्यभार दिला. बंदर संघटनेची स्थापना ही बंदर विकासाच्या दृष्टीने त्यात अधिक सुधारणा, बंदराचा विकास करुन जहाज व जहाजे वहातुकीची गरज पूर्ण करण्यासाठी दळण वळणाबाबत परवाना देणे व संरक्षण करणे, कर आकारणे, वसुली करणे इत्यादि तसेच नौकानयन विषयक कायदे व नियमांच्या वेगवेगळया तरतूदींची अमंलबजावणी इत्यादी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केली होती.

बंदर संघटनेच्या कार्यामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी शासनाने दिनांक ३१/०८/१९९० च्या आदेशानुसार, दिनांक ३० जुन १९९० पासून बंदर विभागामध्ये विभाग प्रमुख म्हणून जल- परिवहन आयुक्त असे भारतीय प्रशासकीय सेवेतील पद निर्माण केले होते व संघटनेतील (१) मुख्य बंदर अधिकारी, (२) जल आलेखक (३) सागरी अभियंता आणि चिफ सर्व्हेअर ही कार्यालये त्यांच्या अधिपत्याखाली आणण्यात आली होती.

राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने लहान बंदराच्या विकासासाठी शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र सागरी मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला व त्याअनांगाने, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, अध्यादेश १९९६, दिनांक ४ ऑक्टोबर १९९६ रोजी घोषित करण्यात आला व शासन निर्णय क्रमांक ईपीटी-१०९६/प्र.क्र.१३३/परिवहन-५, दिनांक २२ नोंव्हेंबर १९९६ अन्वये, दिनांक २२ नोंव्हेंबर १९९६ पासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड कार्यान्वित झालेले आहे. बोर्डाचे एकूण १३ सदस्य असून मा. मंत्री (बंदरे) हे या बोर्डाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. सदस्यांमध्ये ५ सचिव, १ भारतीय नौसेनेचा प्रतिनिधी, सदस्य सचिव यांचा समावेश असून त्याव्यतिरिक्त, बोर्डाला व्यावसायिकता येण्यासाठी जल वहातूक/बंदर काम, व्यवस्थापन, वित्तीय बाबी इत्यादी क्षेत्रातील तज्ञ बोर्डावर अशासकीय सदस्य म्हणून आहेत. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या स्थापनेनंतर पूर्वीच्या बंदर विभागातील जलपरिवहन आयुक्त, मुख्य बंदर अधिकारी, सागरी अभियंता व जल आलेखक हया कार्यालयांचा बोर्डात समावेश करण्यात आलेला आहे.

1. शासकीय व्यवस्थेत महाराष्ट्र सागरी मंडळाचे  स्थान

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड हे शासनाच्या गृह (बंदरे व परिवहन) विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत आहे

२. महाराष्ट्र सागरी  मंडळाच्या अखत्यारितील बंदर समूहनिहाय कार्यक्षेत्र

केनारपटटीवरील ४८ लहान बंदराची खालीलप्रमाणे ५ बंदर समूहांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संमूहांचे प्रभारी हे अधिकारी प्रादेशिक बंदर अधिकारी आहेत.

बंदर समूह

बाद्रा बंदर समूह मोरा बंदरे समूह राजपुरी बंदर समूह रत्नागिरी बंदर समूह वेंगुर्ला बंदर समूह
डहाणू वसई अलिबाग  रत्नागिरी पूर्णगड
तारापूर कल्याण रेवदंडा वरोडा (तिवरी) जैतापूर
नवापूर भिंवडी बोर्ली-मांडला जयगड विजयदूर्ग
सातपाटी ठाणे नांदगांव बोर्या देवगड
केळवा (माहीम) मोरा मुरुड-जंजिरा पालशेत आचरा
अर्नाळा (दातिवरे) करंजा (धरमतर) राजपुरी (दिघी) दाभोळ मालवण
उत्तन मांडवा मांदाड हर्णे निवती
मनोरी ट्रॉम्बे कुंभारु केळशी वेंगुर्ला
वर्सोवा पनवेल (उल्वा बेलापूर) श्रीवर्धन बाणकोट रेडी
बांद्रा (भाऊचा धक्का,गेटवे,घारापुरी ) थळ (रेवस) -- किरणपाणी

३. महाराष्ट्र सागरी मंडळाची वैशिष्टये

  • लोकाभिमुख प्रशासन.
  • प्राप्त अर्जांवर कालबध्द कार्यवाही करणे.
  • पारदर्शक कार्यपध्दतीचा अवलंब करणे व जनतेशी सलोखा ठेवणे.

४. महाराष्ट्र सागरी मंडळाचे नागरिक

बंदर क्षेत्रातील कार्यरत / बंदर क्षेत्राशी निगडीत कंपन्या.
प्रवासी बोटी धारक/ डेजर धारक.
जल वाहतूकीचा वापर करणारे प्रवासी.
मच्छिमार.
खाडया, बंदरातील गाळ काढणारे कंत्राटदार.
बंदर हद्दीतील जागा वापरणारे उद्योजक.
बंदर क्षेत्रात चित्रीकरण करणारे व्यावसायिक.
पोहण्याचा परवाना मागणा-या संस्था / खेळाडू.

५ . महाराष्ट्र सागरी मंडळाच्या नागरीकांकडून असलेल्या अपेक्षा

राज्यातील बंदर विकासाचे धोरण लक्षात घेवून बंदर महसूला बाबतच्या नियमांचे पालन करुन महसूल वाढीमध्ये सहयोग देणे.
प्रचलित नौकानयन नियमांचे पालन करणे.
नौका नोंदणी शिवाय नौकेचे नौवहन न करणे.
प्रवाशी बोटींचा प्रवासी परवान्यांचे विहित मुदतीत नोंदणी नुतनीकरण व सर्व्हे करुन घेणे.
बंदर विकास योजनेला सहकार्य देणे.
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे बंदर विकासाचे धोरण लक्षात घेता व शासनाने या संदर्भात दिलेल्या सवलतीचा फायदा जास्तीत जास्त जनतेने घेवून राज्याच्या औद्यौगिक प्रगतीला हातभार लावणे.

६. महाराष्ट्र सागरी मंडळाची उदिदष्टये

  • महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारितील लहान बंदराचा विकास, नियंत्रण व व्यवस्थापन करणे.
  • महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील खाडया, लहान बंदरालगतचे तसेच कोकण विभागातील नदयामध्ये जल आलेखन सर्व्हेक्षण व इतर संबंधित सर्व्हेक्षणे/अन्वेषणे करणे.
  • सुलभ नौकानयनाकरिता सुविधा पुरविणे.
  • विभागाच्या महसूल वाढीवर भर देणे.
  • बेकायदेशीर नौकानयनास प्रतिबंध करुन त्यावर योग्य नियंत्रण ठेवणे.
  • महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या नैसर्गिक बंदराचा पुरेपुर उपयोग करणे.
  • जल प्रवासी वाहतूकीला प्रोत्साहन देवून रस्ते व रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करणे.
  • सेवा तत्परता हा दृष्टीकोन ठेवणे.
  • जनतेच्या तक्रारीची दखल घेवून त्या त्वरित सोडविणे व त्यांचेशी सौजन्यशील संबंध ठेवणे.
  • या विभागाशी संबंधित प्रमाणपत्रे/परवाने/ना हरकत दाखले देणे बाबत कालमर्यादेचे पालन करणे व जनतेस ती वेळेत मिळतील याची हमी देणे.
  • विभागाचे अधिकारी विनम्र, सौजन्यशील, दृढनिश्चियी व गणवेष व ओळखपत्रानीशी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहतील याची दक्षता घेणे.

७. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत नागरिकांना पुरविल्या जाणा-या सेवा

मुख्य कार्यालयाकडून पुरविल्या जाणा-या सेवा
  स्वनियंत्रित धक्का, बहूउददेशिय धक्के, जहाज बांधणी व तोडणी इ. बंदरांच्या तसेच विकासासाठी शासनाच्या पूर्वमान्यतेने परवानगी देणे.
  जेटटी बांधकाम / वापरासाठी परवानगी देणे.
जल आलेखक यांचे कार्यालयाकडून पुरविण्यात जाणा-या सेवा
  खाडया/ बंदरामध्ये जल आलेखन सर्व्हेक्षण करणे व त्याचे नकाशे इच्छुक व्यक्ती/कंपन्यांना उपलबध करुन देणे.
  • भरती वा ओहटीची माहिती पुस्तिका प्रकाशित करणे.
सागरी अभियंता व चिफ सर्व्हेअर यांचे कार्यालयाकडून पुरविण्यात जाणा-या सेवा
  जलप्रवासी वाहतूकीच्या ठिकाणच्या नौकानयन मार्गातील गाळ काढून तो सुरळीत ठेवणे.
  सुलभ व सुरक्षित नौकानयनासाठी विविध सुविधा पुरविणे व त्यांची दुरुस्ती / देखभाल करणे.
  इनलॉण्ड व्हेसल्स अँक्ट, १९१७ अंतर्गत जलयानांचे सर्व्हेक्षण करुन सर्व्हे प्रमाणपत्र देणे.
प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे कार्यालयाकडून पुरविण्यात जाणा-या सेवा
  मच्छिमारी व प्रवासी बोटींची नोंदणी करणे.
  प्रवासी बोटीना प्रवासी वाहतुक परवाना देणे.
  बंदर कक्षेतील चित्रीकरणाला परवाना देणे.
  पोहण्याच्या शर्यतीतील स्पर्धकाना परवाना देणे.
  नौकानयनांचे नियमन करणे.
  कांही बंदर कक्षत् लागणारे पायलेटेज करणे.
     

८ .इनलॉण्ड व्हेसल्स अँक्ट,१९१७ अंतर्गत जलयानांची नोंदणी

शासनाने राज्यातील अंतर्गत जलयानांची इनलॉण्ड व्हेसल्स ऑक्ट,१९१७ अंतर्गत नोंदणी करण्याकरिता शासन अधिसूचना क्रमांक आयव्हीए ०८/२०००/सीआर-१३४/भाग-२ /पीआरटी-१, दिनांक १५ जुन २००१ अन्वये मुंबई, ठाणे, मुरुड-जंजिरा, रत्नागिरी व वेंगुर्ला ही नोंदणीची ठिकाणे घोषित केली असून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे बंदर अधिकारी, बाद्रा, मोरा, राजपुरी (मुरुड-जंजिरा), रत्नागिरी व वेंगुर्ला यांना नोंदणी अधिकारी म्हणून घोषित केले आहे. इनलॉण्ड व्हेसल्स ऑक्ट, १९१७ खाली जलयानांची नोंदणी करण्यासाठी सादर करावयाची कागदपत्रे-

अ.क्र. बाब पुरावा दर्शविणारी कागदपत्रे
नाव आणि पूर्ण पत्ता पुराव्या पृष्ठयर्थ रेशनकार्डाची छायाकिंत प्रत / अलिकडचे वीज देयक/वाहन चालक परवाना/आधार कार्ड/पासपोर्ट इत्यादिपैकी एक व 3 पासपोर्ट साईज फोटो
व्यवसाय 1) आयकर प्रमाणपत्र/ प्रतिज्ञापत्र (ऍफॉडेव्हीट) 2) लेखापरिक्षांकाने तपासणी केलेले वित्तीय विवरणपत्र 3) स्थानिक पोलीस स्थानाकाकडील ना हरकत दाखला
सारंगाचे नांव क्षमतेबददलचा दाखला मूळ प्रमाणपत्राची साक्षाकिंत प्रत अर्जासोबत जोडावी व मूळ प्रमाणपत्र समक्ष दाखवून तपासून परत घ्यावे.
ज्या ठिकाणी नोंदणी करावयाची आहे त्या बंदराचे नाव मूळ प्रमाणपत्र समक्ष सादर करावे.
जलयानांच्या मालकी हक्का पृष्ठयर्थ दस्तऐवज विक्रीचा करारनामा/बांधणीचे प्रमाणपत्र
इंजिनाची बनावट आणि त्याचा क्रमांक खरेदीची पावती, इंजिनचा क्रमांक असलेली खरेदीची पावती
संयुक्त मालकीच्या जलयानाबाबत भागीदारीचा करारनामा/भागीदारांची नावे

९ . महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत अमंलबजावणी करण्यात येत असलेले अधिनियम

  1. इंडियन पोर्टस् अँक्ट -१९०८
  2. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड अँक्ट – १९९६
  3. महाराष्ट्र मायनर पोर्टस (पॉसेंजर व्हेसल्स ) रुल्स – १९६३
  4. इनलॉण्ड व्हेसल अँक्ट – १९१७

१० . बंदर विषयक पायाभूत सुविधा

या मध्ये (१) हरितक्षेत्र बारमाही बंदरे (२) स्वनियंत्रित धक्के (३) बहूउददेशिय धक्के (४) महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे धक्के असे ४ प्रकार येतात. त्याचबरोबर, राज्यातील अंतर्गत जलवाहतूकीचा विकास याचाही यामध्ये समावेश होतो.

(1) हरितक्षेत्र बारमाही बंदराचा विकासः-
बंदर विकासाचे नवीन धोरण-२०१०

  • शासन गृह विभाग निर्णय क्र. पीआरटी ०५०९/प्र.क्र.२३१/बंदरे-१, दि. २०.८.२०१० अन्वये, महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवरील लहान बंदरे/ बहुउद्देशिय जेट्टी /कार्गो टर्मिनल (रो-रो सर्व्हिसेस) यांच्या विकासाच्या प्रचलित धोरणात सुधारणा करुन नवीन धोरण-२०१० जाहीर.
  • नवीन बंदर विकास धोरण-२०१० ची ठळक वैशिष्टये
  • इच्छुकतेची अभिव्यक्ती (Expression of Interest) व्दारे विकासकाची निवड.
  • करारनाम्याचा कालावधी ५० वर्षाच्या अवधीसाठी BOOST म्हणजेच बांधा, वापरा, वाटा, हस्तांतरित करा या तत्वावर असेल .
  • धक्का भाद्यात सवलतीच्या दारात.
  • बंदर हद्दीपासून नजीकच्या राष्ट्रीय/राज्य महामार्गापर्यंतच्या जोडरस्त्याकरिताचा संपूर्ण निधी विकासक कंपनीने उपलब्ध करुन द्यावा. खर्चाची वसूली विकासक टोल व्दारे करतील.
  • रेल्वे जोडणी ही रेल विकास निगम लि. व विकासक यांनी स्थापन केलेल्या विशेष हेतू वाहन (Special Purpose Vehicle) कंपनीमार्फत करण्यात येईल.
  • बंदर प्रकल्पविषयक कामांकरिता उत्खननावरील रॉयल्टी, बिनशेती आकार, इलेक्ट्रीसिटी डयुटी, नोंदणी व मुद्रांक शुल्क भरण्यापासून आठ वर्षांकरिता सूट.

खाजगी करणाच्या माध्यमातून विकसित होत असलेले बंदर विकास प्रकल्प

अ.क्र. ठिकाण विकासक कंपनीचे नांव
रेवस-आवरे, जि. रायगड रेवस पोर्ट लि. (रिलायन्स गुप)
दिघी, जि. रायगड दिघी पोर्ट लि. (बालाजी गुप)
जयगड (धामणखोल बे), जि. रत्नागिरी जेएसडब्लू जयगड पोर्ट लि. (जिंदाल गुप)
जयगड (लावगण), जि. रत्नागिरी आंग्रे पोर्ट पा.लि. (चौघुले गुप)
विजयदुर्ग, जि. सिंधुदुर्ग विजयदुर्ग पोर्टस् प्रा. लि. (HDIL ग्रुप)
रेडी, जि. सिंधुदुर्ग रेडी पोर्ट लि. (अर्नेस्ट गुप)

(२) स्वनियंत्रित धक्क्याच्या बांधकामाबाबतचे धोरण-
लहान बंदरावर आधारीत उद्योग आणि सुविधा याकरिता स्वनियंत्रित धक्क्याच्या बांधकामासाठी राज्य शासनाची/बोर्डाची धोरणात्मक तत्वे खालील प्रमाणे आहेत. (शासन निर्णय दिनांक २६/०६/१९९५, १९/०८/२००५, २३/११/२००५)

बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर बांधकाम
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाशी करारनाम्याचा कालावधी ३० वर्षे राहील.
राज्य शासन, धक्क्यांच्या ठिकाणी बोलावण्यात येणा-या जहाजांकडून धक्क्याचा आकार वसूल करणार नाही. तथापि, चढणावळ-उतरणावळ शुल्क, जहाजासंबंधीचे शुल्क आदी शासन/महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून अधिसूचित दराने वसूल करण्यात येईल.
बांधकाम, कार्यान्वयन आणि हस्तांतरण या तत्वानुसार ३० वर्षाच्या अखेरीस, सदर धक्का आणि धक्क्यावरील अतिरिक्त बांधकाम शासनाकडे परत देण्यात येईल.

महाराष्ट्र राज्याच्या बंदर हद्दीत सध्या खालील स्वनियंत्रित धक्के कार्यरत आहेत.

अ.क्र. ठिकाण विकासक कंपनीचे नांव
1. पनवेल (उल्वा-बेलापूर) अंबुजा सिमेंट लि.
2. धरमतर-वडखळ जेएसडब्लू धरमतर पोर्ट प्रा.लि.
3. रेवदंडा जेएसडब्लू सलाव लि.
4. दाभोळ रत्नागिरी गॉस ऍन्ड पॉवर प्रा. लि.
5. रत्नागिरी (फिनोलेक्स-रनपार) फिनोलेक्स इंडस्ट्रिज लि. (लिक्वीड जेट्टी)
6. रत्नागिरी (फिनोलेक्स-रनपार) फिनोलेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. (कोल जेट्टी)
7. उम्ब्रोली, ता.मंडणगड मे.Infrastructure Logistic Pvt. Ltd.

(३) बहुउद्देशिय टर्मिनलच्या बांधकामाबाबतचे धोरण-
एखाद्या हरितक्षेत्र बंदराच्या किंवा स्वनियंत्रित धक्क्याच्या तुलनेत कमी गुंतवणूक व अल्प भरण (जेस्टेशन) कालावधी आवश्यक असणा-या बहुउद्देशिय टर्मिनलबाबतचे धोरण शासन निर्णय दिनांक १९/०८/२००५ अन्वये निर्गमित करण्यात आले आहे. प्रमुख धोरणात्मक वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत.

  • बांधा, वापरा, मालकी व हस्तांतरण या तत्वावर विकास.
  • करारनाम्याचा कमाल कालावधी ३० वर्षे
  • शासन/महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड वेळोवेळी विनिर्दीष्ट करील अशा स्वनियंत्रित धक्क्याच्या दराच्या दीडपट दराने चढणावळ/उतरणावळ शुल्काची आकारणी
  • नौकानयन मार्गातील गाळ उपसणीसह आधारभूत पायाभूत सुविधांचा विकास करण्याची व नौकानयन साधनांची तरतूद करण्याची विकासकाची संपूर्ण जबाबदारी

महाराष्ट्र राज्याच्या बंदर हद्दीत सध्या खालील बहुउद्देशिय टर्मिनल कार्यरत आहेत.

अ.क्र. ठिकाण विकासक कंपनीचे नांव
शहाबाज (धरमतर) पीएनपी मेरीटाईम सर्व्हिसेस प्रा. लि.
सानेगांव, रेवदंडा खाडी इन्डो एनर्जी इंटरनॉशनल लि.
जयगड (कातळे) मरिन सिंडिकेट लि.
तेरेखोल, आरोंदा, जिल्हा. सिंधुदुर्ग White Orchid Ltd.

(४) महाराष्ट्र सागरी मंडळाच्या धक्क्याबाबतचे धोरण-
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या मालकीच्या धक्क्यांचा मालहाताळणीसाठी वापर करण्यासाठी इच्छुक असलेल्या उद्योजकांना परवानगी देण्यासंदर्भातील धोरण बोर्डाच्या मान्यतेअंती शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. सद्यस्थितीत, निम्नलिखित उद्योजकांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या जेट्टीवरुन मालहाताळणीसाठी परवानगी देण्यात आली असून, मालहाताळणीसाठीचे संबंधित शुल्क विहीत शासन/महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाव्दारे अधिसूचित दराप्रमाणे करण्यात येते.

महाराष्ट्र सागरी  मंडळाच्या  जेट्टीचा वापर करत असलेल्या कंपन्याः

अ.क्र ठिकाण विकासक कंपनीचे नांव
डहाणू जेट्टी, जि. ठाणे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.
भगवती जेट्टी, जि. रत्नागिरी अल्ट्रा टेक सिमेंट लि.
केळशी, जि. रत्नागिरी आशापुरा माईनकेम लि.

(५) अंतर्गत जलवाहतूकीचा विकास-

संपूर्ण महाराष्ट्रात खाडया, नद्या, अनेक तळी व कालव्यांमध्ये देशांतर्गत जलवाहतूकीच्या संधी उपलब्ध आहेत. देशातील अंतर्गत जलवाहतूकीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाकडून केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत किनारी राज्यांना ९० टक्के अर्थसहाय्य देण्यात येते व उर्वरित १० टक्के निधी संबंधित राज्य शासनाने उभारावयाचा आहे.

हया योजनेअंतर्गत, महाराष्ट्र राज्याकरिता सन २००३-०४ व २००४-०५ मध्ये खालीलप्रमाणे एकूण ८ प्रकल्प मंजूर झाले आहेत.

  • १ . गोदावरी नदीमध्ये विष्णुपुरी, जि. नांदेड
  • २ . दक्षिण मुंबईपासून अंबा नदी/धरमतर खाडीमध्ये, मांडवा
  • ३ . दक्षिण मुंबईपासून अंबा नदी/धरमतर खाडीमध्ये, करंजा
  • ४ . म्हसळा/मांदाड नदीमध्ये (राजपुरी खाडी) राजपुरी
  • ५ . म्हसळा/मांदाड नदीमध्ये (राजपुरी खाडी) दिघी
  • ६ . म्हसळा/मांदाड नदीमध्ये (राजपुरी खाडी) जंजिरा किल्ला
  • ७ . म्हसळा/मांदाड नदीमध्ये (राजपुरी खाडी) आगरदांडा
  • ८ . इसापूर जि. नांदेड

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत हाती घेण्यात येणारी स्थापत्यविषयक अभियांत्रिकी कामे-

  1. मसामं च्या मालमत्ता यांची बांधकाम, देखभाल आणि दुरुस्ती इ.
  2. प्रवासी धक्क्यांचे बांधकाम आणि देखभाल, आणि इतर प्रवासी सुविधा - जल वाहतूक आणि रो-रो सेवा.
  3. आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित ‘शाश्वत किनारा संरक्षण आणि गुंतवणूक कार्यक्रम’  प्रकल्पाची अंमलबजावणी करणे.
  4. मरीना प्रकल्प राबवणे.
  5. पर्यटनासाठी सुविधा उपलब्ध करून देते.
  6. जलप्रवासी वाहतुकीचे जलमार्ग सुरळीत ठेवण्यासाठी गाळऊपसणी करणे.

जलवहातुकीस योग्य असलेल्या ठिकाणी जलवहातुकीसाठी धक्के, जोडरस्ते, प्रवासी निवारे, पाणीपुरवठा इत्यादीची सोय करण्यात येते. तसेच, जलवहातुक सुरक्षित होण्याकरिता आवश्यक त्या ठिकाणी मार्गदर्शक दिवे, बोये इत्यादी सुविधा बंदरात पुरविण्यात येतात.

३. महाराष्ट्र सागरी मंडळाची  कार्यालये

अ.क्र कार्यालयाचे नांव व पत्ता दूरध्वनी क्रमांक फॉक्स क्रमांक
मुख्यालय-
मुख्य कार्यकारी अधिकारी ,
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड,
इंडियन मर्कन्टाईल चेंबर्स,
3¸मजला, बॉलार्ड इस्टेट,
रामजीभाई कमानी मार्ग,
मुंबई - 400 001
022 - 22658375
022 - 22692409
022 - 22612143
022 - 22614331
जल आलेखक,
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड,
गोविंद पाटील मार्ग, खारदांडा,
बांद्रा (प), मुंबई- 400 052.
022 - 26045702 022 - 26044274
सागरी अभियंता व चिफ सर्व्हेअर,
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड,
दादाभाई रोड,भवन्स कॉलेज
समार, अंधेरी (प),
मुंबई - 400 058
022 - 26239945 022 - 26231125
प्रादेशिक बंदर अधिकारी,
बांद्रा बंदरे समूह,
गोविंद पाटील मार्ग,खारदांडा,
बाद्रा ( प ),मुंबई - 400 052
022 - 26490873 022 - 26490873
बंदर अधिकारी, मोरा बंदरं समूह, चेंदणी कोळीवाडा,
मीठबंदर रोड,
ठाणे (पूर्व)
022 - 25428445 022 - 25428445
प्रादेशिक बंदर अधिकारी,
राजपुरी बंदरे समूह,
भाजी मार्केट रोड,
मु.पो.व ता. अलिबाग,
जिल्हा रायगड
02141 - 222746 02141 - 222746
प्रादेशिक बंदर अधिकारी,
रत्नागिरी बंदरे समूह,
मांडवी,बंदर रोड,
मु.पो. ता.व जिल्हा रत्नागिरी.
02352 - 222160 02352 - 222160
प्रादेशिक बंदर अधिकारी,
वेंगुर्ला बंदरे समूह,
साळगांवकर बिल्डिंग,
घर नंबर -32,
परुळेकर गल्ली, मु.पो,.ता.वेंगुर्ला,
जिल्हा सिंधूदूर्ग -416516
02366 – 262077
02366 - 262014
02366 - 262077

नागरीकांना पुरविण्यात येणारे विविध परवाने / अनुज्ञप्त्या व त्यासाठी लागणारी कालमर्यादा

अ.क्र कार्यालयाकडून / विभागाकडून पुरविण्यात येणारी सेवा ( कोणत्या धोरण / अधिनियमान्वये ) प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी नेमूण दिलेले अधिकारी / प्राधिकरण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर प्रकरण निकाली काढण्यासाठी लागणारा अवधी प्रकरणांचा विहित मुदतीत निपटारा न झाल्यास अपीलीय प्राधिकरण  अपीलीय प्राधिकरणास न्याय निवाडा करण्यास लागणारा अवधी
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालयाकडून पुरविण्यात येणारे परवाने / अनुज्ञप्ती
स्वनियंत्रित धक्का / बहुउदेशी धक्का /जहाज बांधणी वापरासाठी लागणारा परवाना (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट 1996 च्या कलम 35 अंतर्गत) मुख्य कार्यकारी अधिकारी १. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयात अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्रकरणाची छाननी करुन प्रकरण दोन ते चार महिन्याच्या आंत बोर्डाच्या मान्यतेसाठी ठेवावे.
२. बोर्डाच्या मान्यतेअंती, सदर प्रकरणावर हेतू पत्र (Letter of Intent) (LOI) देण्यात येईल. ( परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एकंदर कालावधी २-४ महिने )
शासन, गृहविभाग २ महिने
बंदरात आगमन होणा-या प्रवासी माल वाहतूक बोटींना धक्का वापरास परवानगी इंडियन पोर्ट ऑक्ट 1908 च्या कलम 25 अन्वये ( महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट 1996 च्या अधिन राहून ) मुख्य कार्यकारी अधिकारी प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्याकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर दोन ते चार कार्यालयीन दिवसात निर्णय प्रक्रिया पूर्ण करावी अध्यक्ष, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड १ महिना
जल आलेखक यांचे कार्यालयाकडून पुरविण्यात येणारे परवाने / अनुज्ञप्त्यी
  1.  

१.जल आलेखन

२.नकाशा देणे

३.भरती ओहोटी ची पुस्तिका देणे बाबत

(महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून)

जल आलेखक १.जल आलेखन याचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर विभागाने तीन आठवड्यात कारवाई होईल (हवामानाच्या स्थिती तसेच सामग्रीच्या उपलब्धते नुसार) २.जल आलेखन नकाशा व भरती ओहोटी ची पुस्तिका तात्काळ देण्यात येतील (उपलब्धते नुसार). मुख्य कार्यकारी अधिकारी 2 आठवडे
सागरी अभियंता व चिफ सर्व्हेअर यांचे कार्यालयाकडून पुरविण्यात येणारे परवाने / अनुज्ञप्ती
इनलॉण्ड व्हेसल ऑक्ट १९१७ च्या नियम ९ अंतर्गत जलयानाचे सर्व्हेक्षण (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून) सागरी अभियंता व चिफ सर्व्हेअर अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांनी दोन महिन्याचे आत निर्णय प्रक्रिया पूर्ण करावी मुख्य कार्यकारी अधिकारी २ आठवडे
प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे कार्यालयाकडून पुरविण्यात येणारे परवाने / अनुज्ञप्ती
प्रवासी वाहतूक अनुज्ञप्ती ( इंडियन पोर्ट ऑक्ट १९०८ कलम ६ के अन्वये व पॉसेंजर व्हेसल रुल्स १९६३ च्या कलम ३ अंतर्गत तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून ) प्रादेशिक बंदर अधिकारी 1. सहाय्यक बंदर निरीक्षकाकडे/ बंदर निरीक्षकाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांनी एक आठवडयाच्या आंत बंदर अधिकारी यांना अर्ज सादर करावा. 2.प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी सदर प्रकरणावरील निर्णय प्रक्रिया दोन आठवडयात करावी. मुख्य बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड,मुंबई २ आठवडे
प्रवासी वाहतूक अनुज्ञप्तीचे नूतनीकरण ( इंडियन पोर्ट ऑक्ट १९०८ कलम ६ के अन्वये व पॉसेंजर व्हेसल रुल्स १९६३ च्या कलम ३ अंतर्गत तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून ) प्रादेशिक बंदर अधिकारी 1. सहाय्यक बंदर निरीक्षकाकडे/ बंदर निरीक्षकाकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्यांनी एक आठवडयाच्या आंत बंदर अधिकारी यांना अर्ज शिफारशीसह सादर करावा. 2.प्रादेशिक बंदर अधिकारी यांनी सदर प्रकरणावरील निर्णय प्रक्रिया दोन आठवडयात करावी. मुख्य बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड,मुंबई २ आठवडे
बंदरातून निर्गमन होणा-या जहाजांना बंदर निपटारा देणे. ( इंडियन पोर्ट ऑक्ट १९०८ कलम ४३ अन्वये व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून ) सहाय्यक बंदर निरीक्षक/ बंदर निरीक्षक तात्काळ मागणी केल्यानंतर लगेच १ आठवडा
बंदर हदिदतील छायाचित्रीकरण करण्यासाठी परवाना इंडियन पोर्ट ऑक्ट १९०६ कलम ६ ( १ ) जेजे अन्वये तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून ) प्रादेशिक बंदर अधिकारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांत निर्णय प्रक्रिया पूर्ण करावी मुख्य बंदर अधिकारी १ आठवडा
इनलॉण्ड व्हेसल ऑक्ट १९१७ अंतर्गत जलयान नोंदणी इनलॉण्ड व्हेसल ऑक्ट १९१७ च्या कलम १९ फ अन्वये. ( महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून ) प्रादेशिक बंदर अधिकारी अर्ज प्राप्त झाल्यानंतर १० ते १५ दिवसांत निर्णय प्रक्रिया पूर्ण करावी मुख्य बंदर अधिकारी २ आठवडे
पोहण्याचा परवाना (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून) प्रादेशिक बंदर अधिकारी प्रादेशिक बंदर अधिकारी यांच्याकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर एक आठवडयाचे आंत निर्णय प्रक्रिया पूर्ण करावी. मुख्य बंदर अधिकारी २ आठवडे
नागरीकांना पुरविण्यात येणारे विविध परवाने/अनुज्ञप्त्या/सेवा व त्यासाठी असणारे शुल्क .
अ. क्र. कार्यालयाकडून / विभागाकडून पुरविण्यात येणा-या अनुज्ञप्ता व परवाने त्यासाठी आवश्यक असणारे अर्ज व कागदपत्राची यादी अर्जाचा नमुना ज्या कार्यालयात उपलब्ध होईल त्या कार्यालयाचे नाव त्यासाठी लागणारे शुल्क व त्याचे स्वरुप ( रोखीत / डी.डी. द्वारे ) कागदपत्रे व शुल्क कोणत्या कार्यालयात जमा करावे लागणार त्या कार्यालयाचे नांव
प्रवासी वाहतूक अनुज्ञप्ती (इंडियन पोर्ट ऑक्ट १९०८ कलम ६ के अन्वये व पॉसेंजर व्हेसल रुल्स १९६३ च्या कलम ३ अंतर्गत तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऍक्ट १९९६ च्या अधिन राहून) १) अनुज्ञप्तीचे आवेदनपत्र
२) वीमा प्रमाणपत्र
३) सर्व्हे प्रमाणपत्र
४) थर्ड पार्टी इन्शूरन्स प्रमाणपत्र
५) इतर कागदपत्रे (आवश्यक असल्यास)
बंदर निरीक्षक / सहाय्यक बंदर निरीक्षक यांच्या कार्यालयात अ) ५ टनाचे आतील टनभारासाठी रुपये ५०/-
ब) ५ टन ते १० टना पर्यंत रुपये १००/- क) १० टनावरील रुपये १५०/-
बंदर निरीक्षक / सहाय्यक बंदर निरीक्षक यांचे कार्यालयात
प्रवासी वाहतूक अनुज्ञप्तीचे नूतनीकरण (इंडियन पोर्ट ऑक्ट १९०८ कलम ६ के अन्वये व पॉसेंजर व्हेसल रुल्स १९६३ च्या कलम ३ अंतर्गत तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून) मूळ प्रवासी अनुज्ञप्ती परवान्यासोबत आवेदनपत्र
१) अनुज्ञप्तीचे आवेदनपत्र
२)वीमा प्रमाणपत्र
३) सर्व्हे प्रमाणपत्र
४) थर्ड पार्टी इन्शूरन्स प्रमाणपत्र
५) इतर कागदपत्रे (आवश्यक असल्यास)
बंदर निरीक्षक / सहाय्यक बंदर निरीक्षक यांच्या कार्यालयात अ) ५ टनाचे आतील टनभारासाठी रुपये ५०/-
ब) ५ टन ते १० टनपर्यंत रुपये १०/-
क) १० टनावरील रुपये. १५०/-
बंदर निरीक्षक / सहाय्यक बंदर निरीक्षक यांचे कार्यालयात
बंदर हदिदतील छायाचित्रीकरण करण्यासाठी परवाना इंडियन पोर्ट ऑक्ट १९०८ कलम ६ (१) जेजे अन्वये तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून) संबधीत कंपनीचा विनंती अर्ज बंदर निरीक्षक / सहाय्यक बंदर निरीक्षक यांचे कार्यालयात १) सुर्येदयापासून सुर्यास्तापर्यंतच्या चित्रीकरण वेळापत्रकाचे प्रतिदिन दर
२) व्यावसायिक चित्रपट रुपये.१२,०००/-
३) व्यावसायीक मालीका / संगीत संग्रहिका (म्युझिम आल्बम ) रुपये ८०००/-
४) राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडून सहाय्य दिलेल्या चित्रपटांचे, कथापटांचे आणि मालिकांचे प्रसंगचित्रण करणे रुपये ५,०००/-
५) व्यावसायिक जाहिरातपट रुपये ४,०००/-
६) दूरदर्शन माहितीपट व शैक्षणिक चित्रपट आणि मालिका रुपये ३,०००/-
७) स्थिर छायाचित्रण रुपये ५००/-
८) खाजगी कार्यक्रमाचे व्हिडीओ प्रसंगचित्रण करणे रुपये ५००/-
९) राज्य व केंद्र शासनसाठीचे चित्रपट इत्यादींचे प्रसंगचित्रण करणे आणि राज्य किंवा केंद्र शासनाने पुरस्कृत केलेले चित्रपट व माहितीपट इत्यादींचे प्रसंगचित्रण करणे. रुपये काही नाही.
१०) सुर्यास्तापासून ते सुर्येदयापर्यंत चित्रीकरणाकरिता
उपरोक्त पोट-कलम १ मध्ये विहित दराचे दुप्पट शुल्क आकारण्यात येईल
बंदर निरीक्षक / सहाय्यक बंदर निरीक्षक यांचे कार्यालयात
इनलॉण्ड व्हेसल ऑक्ट १९१७ अंतर्गत जलयान नोंदणी
इनलॉण्ड व्हेसल ऑक्ट १९१७, च्या कलम १९ फ अन्वये (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून)
अ) प्रथम नोंदणी
१) फार्म नंबंर – १
२) फार्म नंबंर - ४
३) चेक लिस्ट
४) मालकाचे शपथपत्र
५) बिल्डर सर्टिफीकेट
६) जी ए प्लान
७) टनेज कॉक्ल्यूलेशन
८) मालकाचे फोटो-३
९) मास्टर सटिफीकेट
१०) इंजिनच्या पावत्या
११) बोटीचे फोटो २
१२) सर्व्हे प्रमाणपत्र
१३) लाँचिंग फी / (कन्स्ट्रशन फीची पावती) भुईभडेची पावती
(आवश्यकते नुसार)
१४) इतर कागदपत्रे आवश्यकते नुसार
प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे कार्यालयात (a) On initial registration, the scale of fees
1) Vessel up to 40 GRT Rs.1200/-
2) from 41 to 80 GRT Rs.1800/-
3) from 81 to 120GRT Rs.2400/-
4) from 121 to 160 GRT Rs.3000/-
5) from 161 to 200 GRT Rs.3600/-
6) from 201 to 250 GRT Rs. 4200/-
7) from 251 to GRT and above Rs.20/- per GRT and part there of However maximum Rs.25000/-
(b) For registration any vessel which has been egisteres under the Merchant shipping Act,1958 or any other Act.
1) Vessel registeres in Maharashtra State As per (a) above
2) Vessel registered in other state As per (a) above.
(c) Registration of vessel direstes by the Registering authority. Half of the (a) above
(d) Registration of Altertions to vessel
1) Increase in the GRT Rs.75/- per increased GRT
2) Change in Engine Rs.2000/- per engine
(e) Issue of duplicate certificate Rs.1000/-
(f) Change of ownership of vessel/ Transfer of ownership Rs.5000/-
(g) Appeal Against the decision of registering anthority
Rs.2000/-                         
प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे कार्यालयात
  तात्पुरती नोंदणी प्रमाणपत्र (Provisional Certificate – Valid for 3 Months) १) फार्म नंबर – १
२) फार्म नंबर - ४
३) चेक लिस्ट
४) मालकाचे शपथपत्र
५) बिल्डर सर्टिफीकेट
६) जी ए प्लान (MMB Approved)
७) टनेज कॉक्ल्यूलेशन (MMB Approved)
८) मालकाचे फोटो-3
९) मास्टर सटिफीकेट
१०) इंजिनच्या पावत्या
११) बोटीचे फोटो 2
१२) आवश्यक असल्यास इतर कागदपत्रे
प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे कार्यालयात   प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे कार्यालयात
  ब) मोजमापात फरक १) मूळनोंदणी प्रमाणपत्र
२) बिल्डर सर्टिफीकेट
३) जी ए प्लान (MMB Approved)
४) स्थानीक बंदर कार्यालय यांचेकडील
नो डयूज सर्टिफीकेट (बंदर कराची पावती)
५) सर्व्हे प्रामाणपत्र (Valid
प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे कार्यालयात वाढलेल्या प्रत्येक जीआरटीसाठी रुपये ७५/- प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे कार्यालयात
  क) इंजिनमध्ये बदल १) मूळनोंदणी प्रमाणपत्र
२) इंजिनची पावती
३) बंदर कराची पावती
४) सर्व्हे प्रामाणपत्र (Valid)
प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे कार्यालयात प्रत्येक इंजीन बदल रुपये २,०००/- प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे कार्यालयात
  ड) मालकी हक्कात बदल

१) फार्म नं. १ व ४
२) फार्म नं. ५
३) मालकाचे फोटो-३
४) रेशनकार्ड / इलेक्ट्रीकल बिल / ड्राव्हीग लायन्सस /पॉनकार्ड
५) दोन फोटो (बोटीचे)
६) विक्रीचा करारनामा.
७) इनकम टॉक्स प्रमाणपत्र ८) मूळ प्रमाणपत्र ९) बंदर कराची पावती १०) सर्व्हे प्रमाणपत्र (Valid)

प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे कार्यालयात रुपये 5000/- प्रादेशिक बंदर अधिकारी यांचे कार्यालयात
पोहण्याचा परवाना (महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून) विनंती अर्ज तसेच संरक्षणासाठी जे जलयान वापरले जाईल त्या जलयांनाचा बंदर कर भरणे बंधनकारक जलयानाच्या नोंदणी प्रमाणपत्राची छायांकीत प्रत, बंदर निरीक्षक / सहाय्यक बंदर निरीक्षक यांच्या कार्यालयात पोहण्याचा परवाना निशुल्क बंदर कर टनभाराप्रमाणे (वापरण्यात येणा-या नौकेकरिता) बंदर निरीक्षक / सहाय्यक बंदर निरीक्षक यांच्या कार्यालयात
बंदरातून निर्गमन होणा-या जहाजांना बंदर निपटारा देणे. (इंडियन पोर्ट ऑक्ट १९०८ च्या कलम ४३ अन्वये व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड ऑक्ट १९९६ च्या अधिन राहून)        बंदर निरीक्षक / सहाय्यक बंदर निरीक्षक यांच्या कार्यालयात    बंदर निरीक्षक / सहाय्यक बंदर निरीक्षक यांच्या कार्यालयात
  १. इतर नौका (बाजेर्स, स्पीड बोट, कार्गो नौका)     बंदर निरीक्षक / सहाय्यक बंदर निरीक्षक यांचे कार्यालयात पुढील टनभारानुसार नौकांचा बंदरकराचा भरणा करणे अनिवार्य आहे.
अ) बिगर यांत्रिकी जलयाने
१) ०५ एन आर टी पेक्षा कमी रु.०.५०/- प्रति एन आर टी
२) ०५ ते १० एन आर टी रु. १.००/-
३) १० एन आर टी व त्या वरील रु.२.००/-
ब) यांत्रिक जलयाने परदेशी जाण्या- या जलयानांखेरीज
१) ०५ एन आर टी पेक्षा कमी रु.१.००/- प्रति एन आर टी
२) ०५ ते १० एन आर टी रु. २.००/-
३) १० एन आर टी व त्या वरील रु. ३.००/-
क) परदेशि जाणारी जलयाने ३.०० रुपये प्रति जी आर टी
 
  २ मासेमारी नौका     बंदर निरीक्षक / सहाय्यक बंदर निरीक्षक यांचे कार्यालयात पुढील टनभारानुसार नौकांचा बंदरकराचा भरणा करणे अनिवार्य आहे.
(१) (अ) मासेमारी करणा-या जलयानांसाठी कोणत्याही वर्षाचे १ जूनपासून सुरु होणारे व ३१ ऑगस्टपर्यंतचे कालावधी दरम्यान बंदर कर आकारला जाणार नाही आणि उर्वरित कालावधीसाठी विनिर्दिष्ट केलेल्या बंदर कराचे पन्नास टक्के दराने बंदर कर आकारण्यात येईल.
अ) बिगर इंत्रिकी जलयाने
१) ०५ एन आर टी पेक्षा कमी रु.०.५०/- प्रति एन आर टी
२)०५ ते १० एन आर टी रु. १.००/-
२)१० एन आर टी व त्या वरील रु. २.००/-
ब) यांत्रिक जलयाने परदेशी जाण्या- या जलयानांखेरीज
१)०५ एन आर टी पेक्षा कमी रु.१.००/- प्रति एन आर टी
२) ०५ ते १० एन आर टी रु. २.००/-
३)१० एन आर टी व त्या वरील रु. ३.००/-
क) परदेशि जाणारी जलयाने ३.०० रुपये प्रति जी आर टी.
 

तक्रार निवारण अधिकारी

विभागाकडून पुरविण्यात येणा-या सेवा विहीत कालावधीत पुरविल्या न गेल्यास किंवा इतर काही तक्रार असल्यास खालील अधिका-यांना भेटून किंवा पत्राव्दारे संपर्क साधावा.

मुख्य बंदर अधिकारी
महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई.
इंडियन मर्कन्टाईल चेंबर्स, ३ रा मजला,
रामजीभाई कमानी मार्ग,बॉलार्ड इस्टेट
मुंबई-४०० ००१
दूरध्वनी क्रमांक २२६१५४५७
फॉक्स क्रमांक २२६१४३३१

vegas moose payment flexibility joker lanterns hit n roll online casino bonus buy games brute force slot gacor 777 mitosbet slot power of sun svarog halloween edition betting on serie a video game plinkos video game red baron oksport sports odds goblins gemstones hit n roll slot thracian treasures video game luva supergoal bonus buy games fortune gems 3 bonus buy games valkyries the nibelung legends live casino hotel room service video game sphere smash slot charming hearts live dealer baccarat table free slot egypt bonanza dead canary bonus buy games jazmin s wild ways 3ds xl card slot mc casino betting options slot demo x500 poker OK sport