दृष्टीशेप २०२० चे

  1. सागरी क्षेत्रातील सर्व व्यापारी कामांसाठी उत्तम पायाभूत सेवा सुविधा पुरवठादार होण्याचे लक्ष्य. केवळ नियामक म्हणून मर्यादित न राहता, सागरी क्षेत्रातील उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या सुविधा पुरवण्यावर भर.
  2. सागरी विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या/ ना हरकत प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होतील अशी व्यवस्था विकसित करणे.
  3. सागरमाला, डीएमआयसी अशा प्रकल्पांच्या माध्यमातून सागरी किनाऱ्यांच्या आसपासच्या प्रदेशांचा आणि बंदरांचा विकास करण्यास प्रोत्साहन देणे.
  4. राज्यांतर्गत आणि आपल्या राज्याच्या सीमांतर्गत प्रवासी आणि मालवाहू वाहतुकीला प्रोत्साहन देणे.
  5.  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सल्ल्याने राज्यातील किनारपट्टी, खाड्या, नद्या अशा निसर्गरम्य जागा पर्यटन स्थळे म्हणून विकसित करणे.