ध्येय
सागरी व्यापार व पोत परिवहन उद्योगात शाश्वत वाढ करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या सागर किनाऱ्यांच्या सुप्त क्षमतांचा अधिकाधिक उपयोग करणे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा एकात्मिक आणि शाश्वत विकास करण्यासाठी समुदाय आणि हितसंबंधीयांच्या सहकार्याने धोरणात्मक आराखडा विकसित करणे.
महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासासाठी समान, जबाबदार आणि पर्यावरण स्नेही पद्धतीने उद्यमशील सहभागाला आकर्षित करणे.
सागरी व्यापाराकरिता महाराष्ट्र उद्योजकांसाठी प्रथम पसंतीचे ठिकाण बनवणे.