सागरी अभियंता तथा मुख्य सर्वेषण अधिकारी

महाराष्ट्र सागरी मंडळामध्ये सागरी अभियंता हा एक विभाग सागरी अभियंता तथा चीफ सर्वेअर हे या उपविभागाचे प्रमुख आहेत. सागरी अभियंता यांचे कार्यालयाकडून खालील कर्तव्ये पार पाडली जातात.

  • अंतर्गत जलवाहतूक कायदा १९१७ नुसार, इनलड व्हेसलचे (जहाजांचे) सर्वेक्षण करून प्रमाणपत्र देणे.
  • महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिपत्याखाली असलेल्या जहाजांचे  परिरक्षण व दुरुस्ती करणे.
  • महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मान्यतेप्रमाणे आवश्यक जहाजे खरेदी करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करणे.
  • महाराष्ट्र सागरी मंडळाकडून मंजुरी देण्यात आल्याप्रमाणे महाराष्ट्र किनारपट्टीवरील जलमार्गातील साचलेला गाळ काढण्याची योजना तयार करुन महाराष्ट्र सागरी  मंडळाच्या ड्रेजर च्या सहायाने किवा खाजगी यंत्रणेमार्फत गाळउपसा करुन घेणे.
  • जलवाहतूक करणा-या जहाजाना / नौकांना जलवाहतूक करणे सुकर व्हावे म्हणून जलमार्गात लाईट बोया, बंदरामध्ये वादळ सूचक संदेश उपकरणे इत्यादी सारख्या नौकानयन विषयक उपकरणांची तजवीज करणे. अशा  कामाबाबत आराखडा तयार करणे, प्रकल्पाच्या जागेवर साधनांची उभारणी करणे आणि या साधनाची देखभाल करणे.

सध्या महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अखत्यारीत ४६ लाईट हाउस, ३४ नौवहन खाड्यांमध्ये बोय, ३५ वादळ सूचक यंत्रणा, अशी संपत्ती आहे.

सागरी अभियंता तथा चीफ सर्वेअर विभाग तक्ता  व त्यांची कामकाज कार्यपद्धती.:

Download MECS Department related Forms