महाराष्ट्र सागरी मंडळाचा स्थापत्य अभियांत्रिकी विभाग मुख्य कार्यकारी अधिकारी, सागरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करते. मुख्य अभियंता हे या विभागाचे विभाग प्रमुख आहे. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता हे मुख्य अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात.
पुढील उपक्रम स्थापत्य अभियांत्रिकी विभागाकडून केले जातात.
- ममेबोच्या मालमत्ता यांची बांधकाम, देखभाल आणि दुरुस्ती इ.
- छोट्या धाक्यांचे बांधकाम आणि देखभाल, आणि इतर प्रवासी सुविधा - जल वाहतूक आणि रो-रो सेवा.
- आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित ‘शाश्वत किनारा संरक्षण आणि गुंतवणूक कार्यक्रम’ प्रकल्पाची अंमलबजावणी करणे.
- मरीना प्रकल्प राबवणे.
- पर्यटणासाठी सुविधा उपलब्ध करून देते.
- प्रवासी जलमार्ग सुरळीत ठेवण्यासाठी (कॅपिटल Dredging) नेव्हिगेशन Dredging करणे.
- भारत सरकार तर्फे सहाय्यक कार्यांसाठी व निर्यातीसाठी पायाभूत विकास सहाय्य (ASIDE) या कार्यक्रमाअंतर्गत कामे.
स्थापत्य अभियांत्रिकी विभाग दृष्टीकोन: -
ममेबोच्या निर्यात आणि जल वाहतूक सेवा सुविधा, अंतर्गत जलवाहतूक आणि बंदरे विकासास प्रोत्साहन देण्यासाठी सुविधा पुरविण्यावर लक्ष केंद्रीत करीत आहे.
हा दृष्टीकोन ठेऊन स्थापत्य अभियंत्रिकी विभागाने भारत सरकारच्या योजने अंतर्गत विविध कामे, अंतरजल वाहतूक, मुंबईचा पूर्व सागरी किनाऱ्यावर रो-रो प्याक्स सेवा, मुंबई महानगर विकास प्राधीकरण यांच्या हद्दीत रो-रो धक्के तसेच नौकाविहारासाठी कृत्रिम बंदरे तयार करणे इ. कामे करणार आहोत.
विभाग तक्ता
महाराष्ट्रातील लहान बंदरे/धक्के/जेट्टी संबंधी माहिती
जेट्टी संबंधी माहित
कामांची सद्यस्थिती
MMB DPC BMC Central-Govt-Sponcered Deposite-Works MP-Funds Rail Road Sagarmala