राज्याच्या किनारपट्टीच्या एकूण 720 कि.मी. लांबीपैकी, 320 कि.मी. लांबी ही धूपप्रवण आहे. 106 कि.मी. लांबी ही साधारण धूपप्रवण असून, धूप होण्याच्या बाबतीत 72 कि.मी. लांबी ही अत्यंत संवेदनशील आहे. आतापर्यंत एकूण 142 कि.मी. लांबी ही धूपप्रतिबंधक बंधार्यांनी संरक्षित करण्यात आली आहे.
- राज्याच्या किनारपट्टीनजीकवास्तव्य करणा-या जनतेच्या जिवीत व मालमत्तेचे समुद्राच्या जोरदार लाटांच्या मा-यापासून संरक्षण करण्यासाठी समुद्रधूपप्रतिबंधक उपाययोजनांकरिता एशियन डेव्हलपमेंटबँकेच्या अर्थसहाय्याने रु. ८२७ कोटींचा शाश्वत किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्पसन २०१० ते २०१९ या कालावधीत तीन टप्प्यांत राबविण्यास राज्य शासनाने दि.२६.१०.२०१० च्या निर्णयान्वये मान्यता दिलेली आहे.
- त्यापैकी, पहिल्या टप्प्यातरत्नागिरी जिल्हयातील मिर्या बे येथे पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत, समुद्रात सबमर्ज्ड कपशेप रिफ बनविन्याचे काम पूर्ण झाले आहे.
- हे काम पूर्ण झाल्यावर सागर किनारा परिसर समृद्ध (बीच नरीशमेन्ट) करण्याचे काम देखील पूर्ण झाले आहे.
- या कामासाठी किनारी अभ्यासकांची सल्लगार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती .
- जी आय एस प्रणाली व मोबाइल ऐपचे विकासाचे काम झाले आहे, व सर्वांसाठी वापरासाठी खुले करण्यात आले आहे .
- किनारा व्यवस्थापन योजनेचा आराखडा विविध संस्था/विभाग यांच्या सहभागातून अंमलबजावणीसाठी तयार झाली आहे व ते सागरी मंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे .
- किनारी पायाभूत प्रकल्प आणि व्यवस्थापन विभाग तयार झाले आहे .
- मिऱ्या व इतर ५ ठिकाणांसाठी एस एम ओ पूर्ण झाले असून समुदाय विकासाचे विविध कामे पूर्ण झाली आहे .
शाश्वत किनारा संरक्षण प्रकल्पा अंतर्गत मिरया-रत्नागिरी येथे टाकण्यात येणाऱ्या कृत्रिम रीफ या विषयी चित्रफित
Click here for Video to watch Reef Information and Construction
Click here for Video to watch Actual Reef Construction
Details of SCPMIP Project Works of 2016-17 Click Here
Beach Nourishment Progress
दुसऱ्या टप्पा
सदर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात हाती घ्यावयाच्या कामांचा अभ्यास, आराखडे तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्ती झाली आहे.
ORGANISATION CHART