प्रशासन शाखा

प्रशासन शाखा या विभागात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डामधील मानव संसाधन विकास, अस्थापना व भांडार विषयक कामकाज चालते. या विभागामध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हे या विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत व ते मुख्य कार्यकारी अधिकारी, म.मे.बो. यांच्या पर्यवेक्षणाखाली आपल्या कर्तव्याचे पालन करतात.

मनुष्यबळाची माहिती

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डात गट-अ ते गट-ड मधील ५८ संवर्गात एकूण ५२४ पदे मंजूर आहेत त्यांचे वर्गीकरण खालील प्रमाणे आहे.

गट-अ- ३९ पदे, गट-ब-२६ पदे, गट-क- २६० पदे, गट-ड- १९९ पदे या वर्गीकरणात आहेत मंजूर पदांचा तपशील खालील प्रमाणे : -

अनु. क्र. पदाचे नाव मंजूर पदे
गट-अ- ३९ पदे
1 मुख्य कार्यकारी अधिकारी 1
2 नौकानयन सल्लागार 1
3 मुख्य बंदर अधिकारी 1
4 जल आलेखक 1
5 मुख्य अभियंता 1
6 महाव्यवस्थापक, व्यवसाय विकास 1
7 सागरी सुरक्षा व संरक्षण अधिकारी 1
8 सागरी अभियंता व चिफ सर्वेअर 1
9 वित्तीय नियंत्रक –नि –मुख्य लेखाधिकारी  1
10 वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी 1
11 सर्वेअर  4
12 अधीक्षक अभियंता 1
13 बंदर अधिकारी 6
14 कार्यकारी अभियंता 3
15 उप जिल्हाधिकारी 1
16 उप अभियंता 8
17 उप जलआलेखन सर्वेक्षक 2
18 इलेक्ट्रॅानिक कम इलेक्ट्रिकल ऑफिसर 1
19 उपसंचालक नगररचना / सहाय्यक संचालक नगररचना 1
20 लेखाधिकारी ( सहाय्यक संचालक ) 1
21 तहसीलदार  1
अनु. क्र. पदाचे नाव मंजूर पदे
गट-ब- 26 पदे
1 प्रशासकीय अधिकारी 6
2 लेखाधिकारी 1
3 सहायक सचिव/ विधी अधिकारी 1
4 शाखा अभियंता 1
5 कारटोग्राफर 1
6 सहायक जलआलेखन सर्वेक्षक 4
7 शाखा अभियंता / सहायक अभियंता श्रेणी-२ 12
अनु. क्र. पद मंजूर पदे
गट-क- 260 पदे
1 उच्चश्रेणी लघुलेखक 2
2 निम्नश्रेणी लघुलेखक 2
3 बंदर अधिक्षक 10
4 बंदर निरीक्षक 60
5 सहायक बंदर निरीक्षक 56
6 कनिष्ठ लिपिक 8
7 उप लेखापाल 8
8 जलयान निरीक्षक 2
9 कनिष्ठ अभियंता 18
10 वाहनचालक 12
11 आरेखक 1
12 सहायक आरेखक 3
13 इलेक्ट्रॅानिक असिस्टंट 1
14 सर्वे सहायक 12
15 तांडेल 10
16 ड्रेजर मास्टर 2
17 यारी चालक 2
18 ड्रेजर इंजीनिअर 2
19 मास्टर/सारंग 13
20 इंजिन चालक 13
21 लाइट मॅकॅनिक  1
22 वरिष्ट क्षेत्रीय सहायक 6
23 वंगणगार/ तेलवाला 12
24 यांत्रिकी आवेक्षक 2
25 मंडळ अधिकारी 1
26 रचना सहाय्यक  1
अनु. क्र. पद मंजूर पदे
गट- क-  199 पदे
1 नाईक 9
2 शिपाई/चौकीदार 108
3 नौतल कामगार 11
4 खलाशी 71
 

आस्थापना विभागाची मुख्य कार्ये:

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या आस्थापना विभागात भरती पासून निवृत्तीपर्यंतची सर्व प्रक्रिया हाताळली जाते. तसेच तक्रारीचे निवारण, सेवा रेकॉर्ड, देखभाल, दैनंदिन प्रशासन, करार तत्वावर नेमणूका करणे इ. विषय हाताळले जातात. भरती प्रक्रिया प्रामुख्याने खालील पध्दतीत केली जाते;

  • मुख्य पदांची थेट सरळसेवा भरती
  • अधिकारी /कर्मचार्यांना सेवा जेष्ठतेनुसार बढती देऊन भरती प्रक्रिया.
  • प्रतिनियुक्ती - तांत्रिक आणि इतर क्षेत्रातील कर्मचारी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या नियमाप्रमाणे प्रतिनियुक्तीवर घेतले आहेत. काही अभियंत्यांना सार्वजनिक बांधकाम विभाग, शासकीय कार्यालये तसेच निमशासकीय संस्थांमार्फत नेमणूक केली जाते. अशा नेमणूक कालावधी साधारणपणे शासकीय नियमाप्रमाणे निश्चित केलेला आहे.
  • हे मंडळ विविध पायाभूत सुविधा प्रकल्प संबंधित असल्यामुळे मंडळात अनुभवी आणि कर्तव्यदक्ष  कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. त्यामुळे निवृत्त, अनुभवी आणि हुषार व्यक्ती यांना करार तत्वावर नेमणुका देण्यात येतात.

तात्पुरती सेवा जेष्ठता यादी  

Click here for यादी  

प्रशिक्षण: -:-

कर्मचारी व अधिकारी यांचा कौशल्य/क्षमता विकास होण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम आखले जातात व त्यांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र शासनाच्या ‘यशदा’ या संस्थेद्वारे आयोजित तसेच आवश्यक असेल तेव्हा भारतातील विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये काही प्रशिक्षण आधारित कार्यक्रमाना कर्मचारी व अधिकारी यांना पाठविण्यात येते.