परिचय

किनारी माहिती व्यवस्थापन प्रणाली ही जी.आय.एस (भौगोलिक माहिती प्रणाली) आधारित आहे व या प्रणालीस राज्यात कार्यान्वीत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने (MMB ) 'शाश्वत किनारी संरक्षण आणि व्यवस्थापन गुंतवणूक कार्यक्रम' अंतर्गत विकसित केली आहे.

सागरी मंडळाला विकासाचे निर्णय घेण्यासाठीची माहिती समर्थपणे प्रदान करून किनारा व्यवस्थापन आणि सागरी विकासासाठीची माहिती यात साठवली जाईल.

मुख्य प्रणाली ही दोन भागांत विभागली गेली आहे : माहिती केंद्र आणि ज्ञान केंद्र यात माहिती केंद्र सागरी विकास संदर्भात उपयुक्त माहितीने विस्तृत संग्रह आहे, तर ज्ञान केंद्र हे प्रक्रिया केलेल्या माहितीने विस्तृत असेल. महाराष्ट्रची किनाऱ्या संबंधित इतम्भूत माहिती भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून दिलेली असेल.