प्रमुख कार्य

  • राज्याच्या किनारपट्टी आणि किनारपट्टीच्या पाठीमागील प्रदेशात आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून मालवाहतूकीस चालना देण्याकरिता लहान बंदरांचा विकास करणे.
  • जलवाहतूकीचे नियमन, भाडेतक्ता, जलयानांचे परवाने इत्यादिकरिता तसेच लहान बंदरांचे प्रशासन व संरक्षणाकरिता विविध सागरी अधिनियम व कायद्यांचे अंमलबजावणी करणे.
  • राज्यातील मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूकीकरिता अंतर्गत जलवाहतूकीचा विकास करणे.
  • महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीलगत तसेच कोकण प्रदेशातील खाडयांमध्ये जलआलेखन सर्व्हेक्षण व इतर अन्वेषणे तसेच गाळ उपसणी करणे.
  • जल प्रवासी वाहतुकीसाठी नौकानयन मार्गात गाळउपसणी व देखभाल तसेच नौवहन सुविधांचे देखभाल करणे.
  • स्थापत्य अभियांत्रिकी विभागाद्वारे नवीन धक्के, जेट्टी, महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मालमत्तांची दुरुस्ती व देखभाल करणे.
  • जलक्रीडा साठी परवानगी, त्यांची अंमलबजावणी व नियमन करणे.
  • समुद्र किनाऱ्यावरील सामाजिक व आर्थिक क्षेत्र अंमलबजावणी करणे.
  • समुद्र किनाऱ्यावरील संभाव्य क्षेत्र नियंत्रण आणि वापर करणे .  
  • राज्य शासनाने वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे.