सागरी सुरक्षा

महाराष्ट्र सागरी मंडळाची सागरी सुरक्षा या शाखेचे कामकाज सागरी सुरक्षा व संरक्षण अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली चालते तसेच यामध्ये खालील विषयांचा समावेश आहे.

  1. भारतीय बंदरे अधिनियम १९०८, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड अँक्ट् १९९६, महाराष्ट्र मायनर पोर्ट रुल्स (Passenger Vessels ) १९६३, इनलँड व्हेसल अँक्ट् १९१७ इत्यादी कायद्यांची अंमलबजावणी करणे.
  2. माल हाताळणी करणाऱ्या बंदर/जेट्टी यांच्याशी संबंधित सागरी संरक्षण व सुरक्षा करणे.
  3. आय. एस. पी. एस. ची पूर्तता करणे.
  4. समुद्रामधील तेलगळती बाबत कारवाई करणे.
  5. सागरी सुरक्षा संदर्भात भारतीय तटरक्षक दल / नौदल / सागरी पोलीस विभाग यांच्यासोबत समन्वय ठेवणे व पत्र व्यवहार करणे.
  6. तसेच संबंधित वरील व इतर कोणत्याही प्रासंगिक मुद्दे या शाखेकडून हाताळले जातात.

 

सागरी सुरक्षा संबंधी आपणास काही आक्षेपार्ह माहिती असल्यास किंवा काही मदत हवी असल्यास खालील हेल्पलाईन वर संपर्क करावा:-

  1. महाराष्ट्र पोलीस -सागरी सुरक्षा - १०९३ 
  2. कोस्टगार्ड-०२२-२४३७१९३२, २४३७०४९१, २४३२३२०६, १५५४ 
  3. नौदल -कंट्रोल रूम -२२६६३०३० 
  4. आपत्ती व्यवस्तापण -१०८ किवा  १०७७